पंतप्रधान नरेंद यांनी सहकार क्षेत्रामध्ये जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेला सुरुवात केली. या योजनेसाठी 1.25 लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एका कार्यक्रमात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत 11 राज्यांमधील प्राथमिक कृषी पत सोसायट्यांच्या 11 गोदामांचे उद्घाटन केले. या योजनेअंतर्गत आगामी पाच वर्षांमध्ये सहकार क्षेत्रात 700 लाख टन धान्य साठणूक क्षमता उभारली जाईल, त्यासाठी हजारो गोदामे आणि वेअरहाऊस उभारले जाणार आहेत.


