● 10 ऑगस्ट रोजी ‘जागतिक जैवइंधन दिन’ (World Biofuel Day) साजरा केला जातो. याचा उद्देश जैवइंधनाच्या (biofuel) महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि या क्षेत्रातील सरकारी प्रयत्नांवर प्रकाश टाकणे आहे.
● या दिवसाचा मुख्य उद्देश जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणे आणि जैवइंधनाच्या वापरास प्रोत्साहन देणे आहे.
जैवइंधन म्हणजे काय?
● जैवइंधन हे वनस्पती, शेतीमधील अवशेष आणि कचरा यांसारख्या जैविक स्त्रोतांकडून मिळणारे इंधन आहे.
● जैवइंधनाचा उपयोग काय? हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी, ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी, जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी, शाश्वत विकासासाठी.
● जैवइंधनाच्या वापरामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो, कारण ते जीवाश्म इंधनाच्या तुलनेत कमी ग्रीनहाउस वायू उत्सर्जित करतात.