जागतिक जैव अर्थव्यवस्थेत भारताचे वाढते वर्चस्व सिद्ध करताना, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत उपाययोजना प्रदान करणाऱ्या प्राज इंडस्ट्रीजची जागतिक स्तरावर प्रथम क्रमांकाची कंपनी म्हणून निवड करण्यात आली आहे. वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित जागतिक जैव अर्थव्यवस्थेतील प्रमुख उद्योग परिषद ‘एबीएलसी’ मध्ये नुकतीच ही घोषणा करण्यात आली.
अधिक माहिती
• अशा प्रकारे प्रगत जैव अर्थव्यवस्थेत सर्वोच्च स्थान मिळवणारी ‘प्राज’ ही पहिलीच भारतीय आणि आशियाई कंपनी बनली आहे.
• अमेरिकेतील जैवतंत्रज्ञानविषयीचे सुप्रसिद्ध मासिक असलेले द डायजेस्ट हे जागतिक स्तरावर जैव अर्थव्यवस्थेमधील सर्वात स्पर्धात्मक कंपन्यांची वार्षिक क्रमवारी निवडत असते.
• ही क्रमवारी प्रख्यात ज्युरी सदस्य, आंतरराष्ट्रीय निवडकर्ते आणि त्यांच्या जगभरातील 6.1 दशलक्षपेक्षा जास्त सदस्यांच्या मतांवर आधारित असते.
• हॉटेस्ट कंपन्यांच्या यादीमध्ये अशा संस्थांचा समावेश आहे ज्यांनी पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव निर्माण करून जैव अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिले आहे.
• 6 खंडांमधील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये जागतिक संदर्भ आणि प्रकल्प असलेली ऊर्जा संक्रमण आणि हवामानबदलांवर कमी-कार्बनयुक्त, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत उपाययोजना शोधणारी कंपनी म्हणून, प्राज विश्वपातळीवर नावारूपाला आली आहे.
• प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष :- डॉ. प्रमोद चौधरी
प्राज इंडस्ट्रीज
• प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय प्रक्रिया आणि प्रकल्प अभियांत्रिकी कंपनी आहे.
• स्थापना: 1983
• मुख्यालय: पुणे
• अध्यक्ष: प्रमोद चौधरी
• कंपनीची दक्षिण आफ्रिका, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, कॅरिबियन, थायलंड आणि फिलीपिन्स येथेही कार्यालये आहेत.