- क्रिकेट लढतीत पावसाचा व्यत्यय आल्यास लक्ष्य धावसंख्या निश्चित वापरण्यात येणारी ‘डीएलएस’ अर्थात डकवर्थ लुईस पद्धत सुरू करणाऱ्यातील फ्रैंक डकवर्थ यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.
- डकवर्थ आणि टोनी लुईस या सांख्यिकी तज्ज्ञांनी पावसाने व्यत्यय आणल्यास लढतीत लक्ष्य कसे निश्चित करावे, हे ठरवणारी पद्धत आणली होती.
- त्यात ऑस्ट्रेलियातील सांख्यिकीतज्ज्ञ स्टीवन स्टेर्न यांनी बदल केले. त्यामुळे त्यास ‘डीएलएस मेथड’ असे संबोधले जाते.
- आंतरराष्ट्रीय सामन्यात याची नियमित अंमलबजावणी 2001 पासून झाली.