डॉ. शां. ब. मुजुमदार यांना कुलपती पदक
- ब्रिटनच्या ‘अॅस्टन विद्यापीठा’ ने ‘सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठा’चे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांना नुकताच ‘कुलपती पदक’ हा पुरस्कार प्रदान केला.
- हा पुरस्कार अॅस्टन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अॅलेक्स सुबिक यांच्या हस्ते एका विशेष समारंभात डॉ. मुजुमदार यांना प्रदान करण्यात आला.
- अॅस्टन विद्यापीठाकडून कुलपती पदक हा शैक्षणिक, संशोधन आणि जागतिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा प्रतिष्ठित पुरस्कार आहे.
- या वेळी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, डॉ. संजीवनी मुजुमदार, डॉ. राजीव येरवडेकर, डॉ. स्वाती मुजुमदार आदी उपस्थित होते.
- अॅस्टन विद्यापीठाचा सन्मान असल्याने, हा पुरस्कार त्यांच्या कुलगुरू आणि प्राध्यापकांना दिला जातो. मात्र, या व्यक्तींच्या व्यतिरिक्त हा पुरस्कार मिळवणारे डॉ. मुजुमदार हे पहिले शिक्षणतज्ज्ञ ठरले आहेत.