युरोपियन संघाचे समर्थक डोनाल्ड टस्क यांची पोलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाली. डोनाल्ड फ्रान्सिसझेक टस्क पोलिश राजकारणी असून त्यांचा जन्म जन्म 22 एप्रिल 1957 रोजी झाला. यापूर्वी टस्क यांनी 2007 ते 2014 या काळात त्यांनी या पदावर (पंतप्रधान) काम केले आहे.
• त्यांनी 2014 ते 2019 पर्यंत युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
• टस्क 2019 ते 2022 पर्यंत युरोपियन पीपल्स पार्टी (EPP) चे अध्यक्षदेखील होते.
• त्यांनी 2001 मध्ये सिविक प्लॅटफॉर्मसह – (नागरी व्यासपीठ) स्थापना केली आणि 2003 ते 2014 दरम्यान त्याचे नेतृत्व करून 2021 पासून त्याचे नेते म्हणून काम केले.
• ‘नागरी व्यासपीठ’ या पक्षाचे ते प्रतिनिधित्व करतात.