Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

दक्षिण आफ्रिका कसोटी जगज्जेते South Africa Test World Cup winners

  • Home
  • June 2025
  • दक्षिण आफ्रिका कसोटी जगज्जेते South Africa Test World Cup winners
South Africa Test World Cup winners

● दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर पाच विकेटनी मात करून लॉर्ड्स येथे पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
● ‘आयसीसी’ जेतेपदाची 27 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपविण्यात दक्षिण आफ्रिकेला अखेर यश आले.
● दक्षिण आफ्रिकेच्या संघाला जे करता आले नाही, ते टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वाखालील संघाने करून दाखवले.
● दक्षिण आफ्रिकेने 1998 मध्ये चॅम्पियन्स करंडक (तेव्हाची आयसीसी नॉकआऊट करंडक) स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर जवळपास तीन दशकांनी दक्षिण आफ्रिकेचा पुरुष क्रिकेट संघ जागतिक कसोटीत विजेता ठरला आहे.
● मार्करमसह(136 धावा) बव्हुमा (दुसऱ्या डावात 66 धावा) आणि कगिसो रबाडा (दोन डावांत मिळून 9 बळी) दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
● ऑस्ट्रेलियाने ठेवलेले 282 धावांचे आव्हान आफ्रिकेने सहज पार केले.
● ‘डब्ल्यूटीसी’ जिंकणारा दक्षिण आफ्रिका हा तिसरा संघ ठरला. याआधी न्यूझीलंड (2021), ऑस्ट्रेलिया(2023) अजिंक्यपद मिळवले होते.
● प्लेअर ऑफ द मॅच – एडम मार्करम
● पंच: ख्रिस गॅफनी (न्यूझीलंड)
● रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड)

बक्षीस:

● विजेत्या संघाला 3.6 मिलियन म्हणजे 31 कोटी रुपये तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या संघाला 2.16 मिलियन डॉलर्स म्हणजे 18 कोटी रूपये देण्यात आले
● भारतीय संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाला 12.31 कोटी रुपये बक्षीस

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *