Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

दक्षिण कोरियाचा अभिनेता ली-सून-क्यूनचा मृत्यू

ऑस्कर विजेता चित्रपट ‘पॅरासाइट’मधील दक्षिण कोरियाचा प्रसिद्ध अभिनेता ली-सून-क्यून याचा वयाच्या 48 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. सोल येथे एका कारमध्ये ली-सून-क्यून बुधवारी मृतावस्थेत आढळून आला.
ठळक बाबी
• उत्तर सोलमधील रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमध्ये पोलीस आणि आपत्कालीन अधिकाऱ्यांना ली बेशुद्ध अवस्थेत सापडला. तो मरण पावला असल्याचे आपत्कालीन अधिकाऱ्यांनी नंतर जाहीर केले.
• 2020 मध्ये ‘पॅरासाइट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह अन्य तीन विभागात ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.
• या चित्रपटात लीने एका श्रीमंत कुटुंब प्रमुखाची भूमिका साकारली होती.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *