दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता यांची निवड
- दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या माजी अध्यक्षा आणि प्रथमच आमदार झालेल्या रेखा गुप्ता दिल्लीच्या 9 व्या मुख्यमंत्री झाल्या.
- राजधानीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर झालेल्या एका समारंभात दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
- त्यांनी हिंदीमध्ये शपथ घेतली.
- गुप्ता यांच्यानंतर प्रवेश वर्मा, आशीष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रविंदर इंद्रराज आणि पंकज कुमार सिंग यांनी नवीन मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून शपथ घेतली.
रेखा गुप्ता
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या भाजपच्या आमदार रेखा गुप्ता जिंदाल यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली.
- त्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत शालिमारबाग मतदारसंघातून आमदार आहेत.
- त्यांनी ‘आप’च्या वंदनाकुमारी यांचा 29,595 मतांनी पराभव केला.
- रेखा गुप्ता सध्या दिल्ली भाजपच्या सरचिटणीस आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा देखील आहेत.
- एलएलबी पदवीधर असलेल्या गुप्तां यांचा जन्म 1974 मध्ये हरियाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना उपविभागातील नंदगड गावात झाला.
- त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक होते.
- त्या दोन वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे पालक दिल्लीत रहावयास आले, रेखा गुप्ता यांची जडणघडण दिल्लीतच झाली.
- दिल्ली विद्यापीठात त्यांनी ‘अभाविप’तून राजकारणात प्रवेश केला.
- दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणूनही काम केले
- याआधी त्या दक्षिण दिल्ली नगर परिषदेच्या महापौर होत्या.
दिल्लीच्या यापूर्वीच्या महिला मुख्यमंत्री
- सुषमा स्वराज : भाजप (1998 मध्ये फक्त 52 दिवस)
- शीला दीक्षित : काँग्रेस (1998 ते 2014 – 15 वर्षे दिवस)
- आतिशी : आम आदमी पक्ष (17 सप्टेंबर 2024 पासून 4 महिने 18 दिवस)
- पहिले मुख्यमंत्री – ब्रम्ह प्रकाश(1952 -55)
- केंद्र शाशीत प्रदेश झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री: मदनलाल खुराणा (1993-96)