भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीची 7 क्रमांकाची जर्सी ‘बीसीसीआय’ ने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेटसाठी धोनीने दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता भारताच्या कोणत्याही खेळाडूला 7 क्रमांकाची जर्सी परिधान करता येणार नाही.
• धोनी 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
• धोनीने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.तेव्हापासून भारतीय संघातील एकाही खेळाडूने 7 क्रमांकाचा वापर केलेला नाही.
• यापूर्वी 10 क्रमांकाची जर्सी सचिन तेंडुलकरचा सन्मान म्हणून बीसीसीआय ने निवृत्त केली होती.