- इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ हा इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरव केला.
- इजिप्तसाठी किंवा मानवजातीसाठी अमूल्य काम करणाऱ्या देशांचे प्रमुख, युवराज आणि देशाचे उपाध्यक्ष यांना 1915 पासून हा सन्मान दिला जात आहे .
- पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 13 वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
- सन्मानाचे स्वरूप म्हणून सन्मानर्थी व्यक्तीच्या शुद्ध सोन्याची माळ घातली जाते.
- या माळीमध्ये तीन चौकोनी आकाराची सोन्याची नाणी असतात .
- प्रत्येक नाण्यावर इजिप्त मधील फारोहा काळातील तीन प्रतीके अंकित करण्यात आलेली आहेत
- दुष्टशक्तींपासून संरक्षण , नाईल नदीने आणलेली समृद्धी आणि आनंद ,तसेच संपत्ती अशी ती प्रतीके आहेत.
- इजिप्तला भेट देणारे नरेंद्र मोदी हे मागील 26 वर्षातील भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत
कैरोतील ऐतिहासिक मशिदीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट :
- इजिप्त मध्ये कैरो येथील 11 व्या शतकातील ऐतिहासिक अल – हकीम मशिदीला भेट दिली.
- भारतातील दाऊदी बोहरा समाजाच्या मदतीने या मशिदीचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
- भेटीदरम्यान मोदींनी फातीमिया काळातील शिया मशिदीला भेट दिली.
- ही मशीद सण 1012 मध्ये उभारण्यात आली आहे.
- फातीमिया काळाशी भारतात स्थायिक बोहरा समाजाचा संबंध आहे.
- इजिप्त मधील भारताचे राजदूत अजित गुप्ते यांनी 1970 पासून भारताचे लोक मशिदीची देखभाल करीत असल्याची माहिती दिली.
- इजिप्त भेटीदरम्यान इजिप्त मधील भारतीय समुदायाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘भारताचे नायक’ असे वर्णन करून त्यांची प्रशंसा केली.


