नवीन चावला यांचे निधन
- माजी मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले.
- तृतीयपंथीयांच्या मतदानाच्या हक्कासाठी त्यांनी महत्त्वाची सुधारणा केली.
- चावला हे 1969 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते.
- 2005 ते 2009 या काळात ते निवडणूक आयुक्त होते.
- एप्रिल 2009 ते जुलै 2010 या काळात त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केले.
- निवडणूक आयुक्त होण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय सचिव म्हणूनही काम केले.
- 2009 च्या निवडणुका ते आयुक्तपदावर असताना झाल्या.
- मुख्य निवडणूक आयुक्त असताना त्यांनी कायदा मंत्रालयाकडे निवडणूक आयुक्तांना हटविण्याची प्रक्रिया मुख्य निवडणूक आयुक्तांप्रमाणेच असावी, अशी घटनात्मक सुधारणेची शिफारस केली होती.
- देशाचे 16 वे मुख्य निवडणूक आयुक्त असताना त्यांनी घटनात्मक सुधारणांसाठी प्रयत्न केले.