- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 जून रोजी राणी कमलापती रेल्वे स्थानकामधून पाच वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला .
- यापैकी दोन रेल्वे मध्य प्रदेशात धावणार आहेत तर तीन रेल्वे गाड्या देशाच्या इतर भागातील शहरांना जोडणार आहेत.
- राणी कमलापती (भोपाळ)- जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस, खजुराहो- भोपाळ- इंदूर वंदे भारत एक्सप्रेस, मडगाव (गोवा)- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस, धारवाड – बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस आणि हटिया- पाटणा वंदे भारत एक्सप्रेस या पाच रेल्वे गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.
- एकाच दिवसात इतक्या संख्येने वंदे भारत सुरू करण्याची ही पहिलीच वेळ.
- हटिया आणि पटना वंदे भारत एक्सप्रेस ही बिहार आणि झारखंड मधील पहिलीच वंदे भारत एक्सप्रेस आहे.


