● लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा 2025 चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे .
● टिळक स्मारक मंदिरात 1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होईल.
● टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी घोषणा केली.
● लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करून गडकरी यांनी रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत मोठे कार्य सुरू केले आहे.
● देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची 43 व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
● लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यास 1983 पासून सुरुवात झाली पहिला पुरस्कार एसएम जोशी यांना देण्यात आला.
● याआधी 2024 मध्ये सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
● पुरस्काराचे स्वरूप: स्मृतीचिन्ह सन्मानपत्र आणि एक लाख रुपये