Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

निधन : डॉ. पौर्णिमा आडवाणी

राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष, लेखिका आणि प्रख्यात वकील डॉ. पौर्णिमा आडवाणी यांचे 1 एप्रिल रोजी मुंबईत वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले .

अल्पपरीचय:

पौर्णिमा आडवाणी या 2002 ते 2005 या दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले . ‘द लॉ पॉईंट’ या कंपनीच्या प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. मुंबई विद्यापीठ, क्विंसलँड विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि अन्य ठिकाणी त्यांनी व्याख्यात्या म्हणूनही काम केले . 1997 मध्ये त्यांनी ‘इंडियन ज्युडिशियरी: ए ट्रिब्यूट’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकासाठी 2003 मध्ये आचार्य तुलसी कार्तित्व पुरस्काराने डॉ. अडवाणी यांना गौरविण्यात आले होते. मागील दोन वर्षापासून त्या कर्करोगाने आजारी होत्या.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *