● भारतीय नेमबाजीच्या प्रगतीत मोलाचा वाटा असलेले माजी राष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक सनी थॉमस यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.
● थॉमस हे 1993 ते 2012 या कालावधीत भारतीय नेमबाजी संघाचे प्रशिक्षक होते.
● त्यांचा 2001 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
● राजवर्धन राठोडने 2004 मध्ये अॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले.
● त्या वेळी थॉमस हे भारतीय नेमबाजी संघाच्या प्रशिक्षक होते.
● अभिनव बिंद्राचे ऑलिम्पिक सुवर्णपदक हे थॉमस यांचे सर्वांत मोठे यश समजले जाते.
● बिंद्राने थॉमस हे पितृतुल्य व्यक्तीमत्त्व होते, असे म्हटले आहे.