- भारत मंगोलियाचा 16 वा संयुक्त युद्ध सराव ‘नोमॅडिक एलिफंट’ मेघालयातील उमरोई येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे प्रारंभ झाला.
- हा युद्धसराव 3 ते 16 जुलैदरम्यान संपन्न होईल.
- भारताच्या 45 जणांच्या पथकाचे प्रतिनिधित्व सिक्कीम स्काऊट्स ची एका बटालियन तसेच अन्य शाखा आणि सेवा दलातील जवान करत आहेत.
- मंगोलियाच्या पथकाचे प्रतिनिधित्व मंगोलियन लष्कराच्या 150 क्विक रिअक्शन फोर्स बटालियन चे जवान करत आहेत.
- ‘नोमॅडीक एलिफंट’ हा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाचा एक भाग असून तो आलटून पालटून मंगोलिया आणि भारतात आयोजित केला जातो.
- याआधीचा सराव मंगोलियात जुलै 2023 मध्ये आयोजित केला गेला होता.
- ‘नोमॅडीक एलिफंट’ या युद्धसरावाच्या उदघाटन प्रसंगी मंगोलियाचे भारतातील राजदूत डाम्बजाविन गनबोल्ड व भारतीय सैन्यदलातर्फे 51 सब एरिया जी ओ सी मेजर जनरल प्रसन्न जोशी उपस्थित होते.
सरावाचे उद्दीष्ट:
- संयुक्त राष्ट्रसंघ मॅण्डेट अंतर्गत सातव्या प्रकरणातील सब कॉन्व्हेंशनल सिनॅरिओ मधील घूसखोरीविरोधी मोहीमा चालवण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांच्या संयुक्त लष्करी क्षमता वाढवणे हे या युद्धसरावाचे उद्दिष्ट आहे.
- या सरावात निमशहरी व डोंगराळ भागातील मोहिमांवर भर दिला गेला आहे.
- नोमॅडीक एलिफंट’ या युद्धसरावात दोन्ही देशांना संयुक्त मोहिमांमध्ये उपयोगी येणारी आपली युद्धकौशल्ये सामायिक करता येतील.
- या युद्धसरावामुळे दोन्ही देशांच्या सैन्यदलांमध्ये सहकार्य सुलभ होईल, बंधुभाव निर्माण होईल तसेच संबंधही सुधारतील.
- यामुळे या दोन्ही मित्रदेशांमधील संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढीस लागेल व द्विपक्षीय संबंधातही अधिक सुधारणा होईल.