क्रीडा
न्यूझीलंडची पंचम किम कॉटन ठरली पहिली महिला पंच
न्यूझीलंडची 45 वर्षीय महिला क्रिकेट पंच किम कॉटन ही पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात पहिली महिला पंच होण्याचा इतिहास रचला.. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात मैदानावरील पहिली महिला पंच म्हणून कॉटनने बहुमान मिळवला किम कॉटन हिने याआधी महिला क्रिकेट मधील 54 टी-20 सामन्यात तर 24 एकदिवसीय सामन्यात मैदानातील पंच आणि टीव्ही पंच म्हणून काम पाहिले आहे. महिलांसाठी 2023 मधील विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत देखील कॉटनने पंच म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. याआधी ऑस्ट्रेलियाची क्लेअर पोलोसाक ही पुरुष विभागाच्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात चौथी पंच म्हणून कार्यरत होती. भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सिडनी येथे 2021 मध्ये कसोटी सामना खेळवण्यात आला या कसोटीत ती चौथी पंच म्हणून निवड करण्यात आली होती.