Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘पीडीपी’ च्या अध्यक्षपदी मुफ्ती यांची फेरनिवड

  • Home
  • Current Affairs
  • ‘पीडीपी’ च्या अध्यक्षपदी मुफ्ती यांची फेरनिवड

● जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची 3 वर्षांसाठी ‘पीडीपी’ च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

मेहबूबा मुफ्ती सईद:

● जन्म:- 22 मे 1959, जि. अनंतनाग

● जम्मू आणि काश्मीर राज्याचे माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ह्या पक्षाचे अध्यक्ष आहेत.

● वडील मुफ्ती महंमद सईद ह्यांच्या मृत्यूमुळे एप्रिल 2016 या वर्षी सत्तेवर आलेल्या मेहबूबा मुफ्ती राज्याच्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री होत्या.

● 2018 साली भारतीय जनता पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुफ्ती यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

● ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने भारतीय संविधानाचे कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीर राज्याचा दर्जा काढून घेतला व जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवले. तेव्हा कायदा व सुव्यवस्थेसाठी मेहबूबा मुफ्तीला अनेक काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *