पुणे येथे भू– अर्थशास्त्र परिषद
- केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) यांच्या वतीने सहाव्या ‘आशिया इकॉनॉमिक डायलॉग’ या वार्षिक भू-अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.
- ही परिषद 20 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत पुणे येथील बाणेरमधील पंचवटी परिसरातील पीआयसीच्या नवीन कॅम्पसमध्ये होणार आहे.
- या परिषदेची संकल्पना : ‘विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान’
- या परिषदेत 12 सत्रे होणार असून, त्यामध्ये 9 देशांतील 40 वक्ते सहभागी होणार आहेत. यात ऑस्ट्रेलिया, इजिप्त,इंडोनेशिया, जपान, नेपाळ, नेदरलँड, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या नऊ देशांतील धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योगतज्ज्ञांचा समावेश असेल.
- उद्घाटन सत्रात परिषदेचे संयोजक आणि चीन, भूतान या देशांत भारताचे राजदूत म्हणून काम केलेले गौतम बंबावाले हे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ‘बायोकॉन समूहा’च्या अध्यक्ष किरण मुजुमदार-शॉ यांच्याशी लेखिका रमा बिजापूरकर संवाद साधणार आहेत.