पुणे विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव
- लोहगावयेथील विमानतळाला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला .
- राज्यसरकारने मान्यता दिलेला हा प्रस्ताव आता केंद्राकडे जाणार असून तेथे अंतिम मान्यता मिळाल्यानंतर विमानतळाला हे नाव दिले जाणार आहे .
- पुण्यातीललोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव द्यावे असा प्रस्ताव केंद्रीय हवाई नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडे दिला होता.
- लोहगावहे संत तुकाराम महाराज यांचे आजोळ होते.
- तुकाराममहाराजांचे बालपण देखील येथेच गेल्याने लोहगाव आणि तुकोबा यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे गावकरी, महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाच्या इच्छेसह विमानतळाला संत तुकाराम महाराज यांचे नाव द्यावे हा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला होता.
ऑस्करसाठी भारतातर्फ ‘लापता लेडीज‘ या चित्रपटाची घोषणा
- किरणराव यांनी दिग्दर्शित केलेल्या लापता लेडीज या चित्रपटाची ऑस्कर 2025 साठी भारतातर्फे निवड करण्यात आली आहे.
- भारतीयचित्रपट महासंघाने चेन्नई या ठिकाणी या चित्रपटाची घोषणा केली.
- मोठ्यापडद्यावर गाजलेला ऍनिमल राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळम चित्रपट अट्टम आणि कान्स महोत्सवात विजेता ठरलेला ऑल वी इमॅजिन ऍज लाइट यांसह 29 चित्रपटांबाबत चर्चा करण्यात आली मात्र आमिर खान प्रोडक्शन ची निर्मिती असलेल्या लापता लेडीजने यात बाजी मारली.
- आसामीदिग्दर्शक जहाणू बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील 13 सदस्यांच्या निवड समितीने एकमताने या चित्रपटाची निवड केली.
लापता लेडीज या चित्रपटाविषयी
- हाचित्रपट महिला सक्षमीकरणावर आधारित असून पितृसत्ताक संस्कृतीवर भाष्य करतो.
- चित्रपटाचीकथा दोन नववधूंच्या अवतीभवती फिरते,ज्यांची त्यांच्या पतीच्या घरी जाताना रेल्वे प्रवासादरम्यान अदलाबदल होते.
- याचित्रपटात कोणत्याही प्रसिद्ध कलाकारांना न घेता नवख्या कलाकाराने काम केले आहे.
- प्रतिभारंता, स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोयल आणि रवीकिशन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
- चित्रपटसमीक्षकांपासून प्रेक्षकांना या सिनेमाची अनोखी गोष्ट भावली होती .
- 1 मार्च2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.