- विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरी अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अलकाराझने सर्बियाचा अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोविचवर 6-2, 6-2, 7 -6(7-4) अशा सर्व सेट मध्ये मात केली .
- हे अल्कराझचे चौथे ग्रँड स्लॅम चषक आहे.
अल्कराझची कामगिरी…
- वयाच्या 22 वर्षांच्या आत विम्बल्डन दोन वेळा जिंकण्याच्या बियॉर्न बोर्ग, बोरिस बेकरच्या कामगिरीशी बरोबरी
- एकाच वर्षांत फ्रेंच आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकणारा सहावा खेळाडू. यापूर्वी रॉड लेव्हर, बियॉर्न बोर्ग, रॉजर फेडरर, रॅफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच
- वयाच्या 21 व्या वर्षीच चार ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपदे. (2022 अमेरिकन, 2023 विम्बल्डन, 2024 फ्रेंच आणि विलम्बल्डन)
- विम्बल्डन स्पर्धेचे पुरुष एकेरीतील सर्वाधिक वेळा विजेतेपद स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या नावे आहेत त्याने एकूण आठ वेळा विम्बल्डन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
विम्बल्डन स्पर्धा
- 2024 ची एकूण 137 वी स्पर्धा
- ठिकाण : लंडन
- सुरवात : 1877
- सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा
- ही स्पर्धा ग्रास कोर्ट वरती खेळवली जाते.