भारताचा तारांकित टेनिसपटू रोहन बोपण्णाने वयाच्या 43 व्या वर्षी दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यापाठोपाठ पुरुष दुहेरीच्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचे स्वप्नही पूर्ण केले.
बोपण्णाने मॅथ्यू एब्डेनच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले. त्याचे हे विजेतेपद ऐतिहासिक ठरले आहे.
अधिक माहिती
● ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा बोपण्णा सर्वांत वयस्क टेनिसपटू ठरला आहे.
● अंतिम लढतीत दर्जेदार खेळ करताना दुसऱ्या मानांकित बोपण्णा-एब्डेन जोडीने इटलीच्या सिमोने बोलेल्ली-आंद्रेआ वावास्सोरी जोडीचा 7-6 (7-0), 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
● बोपण्णाने सर्वांत वयस्क ग्रँडस्लॅम विजेता पुरुष टेनिसपटू म्हणून मिरवण्याचा मान मिळवताना जीन-ज्युलिएन रॉजरचा(40 वर्ष 270 दिवस) मोडीत काढला.
● रॉजरने मार्सेलो अरेव्होलाच्या साथीने खेळताना 2022 या वर्षी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती.
● तसेच ऑस्ट्रेलियात पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवणारा बोपन्ना दुसरा भारतीय ठरला.
● यापूर्वी लेंडर पेसने राडेक स्टेपानेकच्या साथीत 2012 मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते.
● रोहन बोपण्णाने कारकिर्दीतील दुसरे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले.
● यापूर्वी, त्याने 2017 मध्ये कॅनडाच्या गॅब्रिएला डाब्रोव्स्कीच्या साथीत फ्रेंच ओपन स्पर्धेतील मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले होते.
● पुरुष दुहेरीत ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा बोपण्णा तिसरा भारतीय ठरला.
● यापूर्वी, लिअँडर पेसने आठ वेळा, तर महेश भूपतीने चार वेळा हे यश मिळवले आहे.
● बोपण्णाने पुरुष दुहेरीत पहिलेवहिले ग्रँड स्लॅम जेतेपद मिळवले. त्याला 2010 आणि 2023 अमेरिकन ओपनमध्ये संधी होती. त्या वेळी त्याला उपविजेतेदावर समाधान मानावे लागले होते.
ऑस्ट्रेलियात जिंकणारा चौथा भारतीय
● ऑस्ट्रेलिया ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा बोपण्णा चौथा भारतीय ठरला आहे.
● यापूर्वी अशी कामगिरी लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनी केली आहे.
● यामध्ये महेश भूपतीने केवळ मिश्र दुहेरीत (2006, 2009) दोन विजेतेपदे मिळवली आहेत.
● पेसने पुरुष दुहेरीत (2012) एकदा आणि मिश्र दुहेरीत (2003, 2010, 2015) तीन विजेतेपदे मिळवली.
● सानियाने महिला (2016) आणि मिश्र दुहेरीत (2009) एकेकदा यश संपादन केले.
● ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील भारतीयांच्या यशात मार्टिना हिंगिसचाही मोठा वाटा राहिला आहे. हिंगिसच्या साथीने पेस, भूपती,सानियाने किमान एकदा विजेतेपद मिळवले होते.