पूर्णिमा देवी बर्मन‘वूमन ऑफ द इयर‘
- भारतीय जीवशास्त्रज्ञ, वन्यजीव संवर्धक पूर्णिमा देवी बर्मन (वय ४५) यांचा ‘टाइम’ मासिकाने ‘वूमन ऑफ द इयर’ च्या यादीमध्ये स्थान देऊन सन्मान केला.
- पूर्णिमा देवी बर्मन या एकमेव भारतीय महिला ‘टाइम’ च्या 2025 च्या ‘वूमेन ऑफ द – इयर’च्या यादीमध्ये आहेत.
हरगीला आर्मी आणि पूर्णिमा देवी बर्मन
- बर्मन यांना त्यांची ‘हरगीला आर्मी’ मदत करते.त्या हरगीला आर्मी च्या संस्थापक आहेत.
- त्यांच्या या पथकामध्ये तब्बल 20 हजार महिला पक्ष्यांसाठी काम करतात. पक्ष्यांचे घरटे वाचवितात आणि इतरांना त्याचे शिक्षण देतात.
पुरस्कार आणि सन्मान
- बर्मन यांना 2017 मध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रदान केलेला नारी शक्ती पुरस्कार (भारतीय महिलांसाठीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार) मिळाला होता .
- तसेच 2017 मध्ये, युनायटेड किंग्डमच्या राजकुमारी रॉयल अॅन यांनी त्यांना व्हिटली पुरस्कार (ज्याला ग्रीन ऑस्कर असेही म्हणतात) प्रदान केला .
- बर्मन यांना कन्झर्वेशन लीडरशिप प्रोग्राम (CLP) कडून लीडरशिप अवॉर्ड 2015,
- फ्युचर कन्झर्वेशनिस्ट अवॉर्ड 2009,
- युनायटेड नेशन्स कडून UNDP इंडिया बायोडायव्हर्सिटी अवॉर्ड 2016,
- रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड RBS “अर्थ हिरो अवॉर्ड” 2016,
- BSNL कडून 2017 मध्ये भारत संचार रोल ऑफ ऑनर 2017,
- बालीपारा फाउंडेशन “ग्रीन गुरू अवॉर्ड” 2016, आणि 2017 मध्ये नॉर्थ ईस्ट कडून FIICI FLO वुमन अचीव्हर अवॉर्ड मिळाला आहे.
हरगीला आर्मीचे काम
- घरटी झाडांचे संरक्षण करणे
- कृत्रिम घरटी झाडे पुरवणे
- घरट्यातून पडलेल्या पिलांना वाचवणे
- जखमी पक्ष्यांचे पुनर्वसन करणे. इ.