Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकरला कांस्यपदक

  • हरियाणाच्या मनू भाकरने ऑलिम्पिक नेमबाजीतील भारताची 12 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपवताना पॅरिसमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
  • ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भारताची पहिली महिला नेमबाज आहे.
  • 22 वर्षीय मनूने7 गुणांचा वेध घेत कांस्यपदक मिळवले.
  • नेमबाजीत पदक मिळवणारी मनू पाचवी भारतीय नेमबाज.
  • याआधी राज्यवर्धन राठोड (डबल ट्रॅप रौप्य, 2004), अभिनव बिंद्रा (10 मीटर एअर रायफल सुवर्ण, 2008), विजय कुमार (रॅपिड फायर पिस्तूल रौप्य, 2012) आणि गगन नारंग (10 मीटर एअर रायफल कांस्य) यांना पदके.
  • कोरियन खेळाडूंमध्ये रौप्य आणि सुवर्ण पदकसाठी लढत पार पडली.
  • जिन ओह हिने2 गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर येजी किम हिने 241.3 गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली.भारताची मनू भाकर 221.7 गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली.
  • मनू भाकर हिने पात्रता फेरीत 580 गुणांची कमाई केली, तसेच यादरम्यान पैकीच्या पैकी गुण तिने 27 वेळा मिळवले. ही संख्या सर्वोच्च ठरली.
  • नेमबाजीतील वैयक्तिक प्रकाराची अंतिम फेरी गाठणारी मनू भाकर ही मागील 20 वर्षांतील पहिलीच भारतीय महिला नेमबाज ठरली.
  • याआधी सुमा शिरुरने 2004मधील अथेन्स ऑलिंपिकमधील 10 मीटर एअर रायफल प्रकाराची अंतिम फेरी गाठली होती.

मनू भाकरची कारकीर्द:

  • 22 वर्षीय मनू हरियाणातील झज्झर जिल्ह्यातील गोरिया गावातील.
  • वडील मर्चेंट नेव्हीत मुख्य अभियंता.
  • वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत ती मार्शल आर्ट, बॉक्सिंग, टेनिस, स्केटिंग असे खेळ खेळत होती.
  • यानंतर तिने आपला मोर्चा नेमबाजीकडे वळविला.
  • 2023 मध्ये बाकू आणि 2022मध्ये कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण, रौप्य
  • 2022च्या हाँग्वझू आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक
  • वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत आतापर्यंत नऊ सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन ब्राँझपदक
  • आशियाई अजिंक्यपदक स्पर्धेत दोन सुवर्ण
  • 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक
  • जागतिक ज्युनियर स्पर्धेत चार सुवर्णपदके

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *