Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

पोप लिओ 14 वे’ सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू Pope Leo 14th Supreme Pontiff

Pope Leo 14th Supreme Pontiff

● कार्डिनल रॉबर्ट प्रिव्होस्ट यांची २६७ वे ‘पोप’ म्हणून निवड झाली.
● त्यांनी ‘पोप लिओ 14वे’ हे नाव आता धारण केले असून अमेरिकेत जन्माला आलेले ते पहिलेच सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू ठरले आहेत.
● पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर प्रथेप्रमाणे व्हॅटिकनमधील सिस्टीन चॅपलमध्ये ‘कॉन्क्लेव्ह’ नावाने ओळखली जाणारी ही गुप्त निवडणूक झाली.
● चॅपलवर उभारलेल्या तात्पुरत्या धुरांड्यामधून पांढरा धूर येताच सेंट पिटर्स स्क्वेअरमध्ये उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी एकच जल्लोष केला.
● त्यानंतर 70 मिनिटांनी 69 वर्षीय कार्डिनल प्रिव्होस्ट यांची ‘पोप’ म्हणून निवड झाल्याचे जाहीर केले.
● आपल्या पहिल्या संदेशात ‘पोप लिओ 14 वे’ यांनी दिवंगत पोप फ्रान्सिस यांचे स्मरण केले आणि जागतिक शांतीसाठी प्रार्थना केली.
● त्यांचा जन्म अमेरिकेच्या इलिओनिस प्रांतातील शिकागो शहरात झाला असला, तरी तरुण वयापासून ते रोममध्ये वास्तव्यास होते.
● त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशात धर्मप्रसाराचे काम केले.
● 2014 ते 2023 या काळात ते पेरूमधील चिक्लायो शहराचे बिशप होते.
● 2023 मध्ये पोप फ्रान्सिस यांनी त्यांना व्हॅटिकनमध्ये महत्त्वाची जबाबदारी देऊ केली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *