Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

 

  • मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचा मत्स्यव्यवसाय विभाग सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये वित्तीय वर्ष 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या कालावधीत मत्स्यव्यवसाय क्षेत्रात 20,050 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह  “प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय)” ही प्रमुख योजना राबवत आहे.
  • प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) ही संपूर्ण देशातील मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी लागू करण्यात आलेली प्रमुख योजना आहे.
  • या योजनेंतर्गत 2024-25 पर्यंत मत्स्य निर्यात 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
  • भारतातील सागरी अन्न निर्यात वित्तीय वर्ष 2013-14 पासून दुप्पट झाली आहे.
  • 2013-14 मध्ये भारताची सागरी अन्न निर्यात 30,213 कोटी रुपये इतकी होती. ती 2023-24 मध्ये 60,523.89 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
  • याव्यतिरिक्त, सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (एमपीइडीए) माहिती दिली आहे की, त्यांनी 2030 पर्यंतच्या भारताच्या सागरी उत्पादन निर्यात क्षेत्रासाठी एक “व्हिजन डॉक्युमेंट – 2030” तयार केले आहे.
  • या दस्तऐवजात 2030 पर्यंत 18 अब्ज अमेरिकी डॉलर इतका निर्यात महसूल साध्य करण्याचा प्रस्ताव आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *