Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

प्राणी प्रजातींची प्रथमच नोंद

  • देशात आढळणाऱ्या प्राण्यांच्या सर्व प्रजातींची नोंद भारताने केली आहे.
  • एकूण 1 लाख 4 हजार 561 प्रजातींची नोंद करण्यात आली असून ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे.
  • झूऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (झेडएसआय) 109 व्या स्थापनादिनानिमित्त ‘फॉना ऑफ इंडिया चेकलिस्ट पोर्टल’चे उद्घाटन कोलकता येथे करण्यात आले. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव उपस्थित होते.
  • देशातील सर्व प्राणी प्रजातींची नोंद केली असल्याने जैववैविध्याची नोंद करण्याच्या क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करू शकतो, असे यादव यांनी यावेळी सांगितले.
  • सर्व प्राण्यांची नोंद घेतली गेली असल्याने संशोधक, प्राध्यापक, अभ्यासक आणि धोरणकर्त्यांना त्याचा उपयोग होणार
  • ‘झेडएसआय’ने तयार केलेल्या या नोंदीमध्ये एकूण 121 प्रकारच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत.
  • या यादीत नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींचाही समावेश करण्यात आला आहे.
  • केंद्र सरकारने ‘एक पेड माँ के नाम’ हा नवीन उपक्रम देखील सुरू केला आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *