- दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो.
- हा दिवस संपूर्णपणे जगातील आदिवासींना समर्पित आहे.
- उद्देश :जगातील आदिवासी लोकांच्या हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे संरक्षण करणे आणि पर्यावरण संरक्षणासारख्या जागतिक समस्यांमध्ये आदिवासी लोकांचे योगदान ओळखणे.
इतिहास
- डिसेंबर 1994 मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने ठरवले की दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जावा.
- 1982 मध्ये जिनिव्हा येथे झालेल्या मानवाधिकारांच्या संवर्धन आणि संरक्षणावरील उपयोगाच्या स्वदेशी लोकसंख्येवरील संयुक्त राष्ट्रांच्या कार्यगटाच्या पहिल्या बैठकीला मान्यता म्हणून ही तारीख निवडण्यात आली होती.
बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन
- पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.
अल्पपरीचय:
- बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकाता येथे विद्वानांची परंपरा असलेल्या कुटुंबात झाला.
- त्यांचे आजोबा कृष्णचंद्र स्मृतितीर्थ हे संस्कृत विद्वान होते.
- आधुनिक बंगाली काव्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रसिद्ध बंगाली कवी सुकांता भट्टाचार्य यांचे ते दूरचे नातेवाइक होते.
- ते स्वतः एक यशस्वी लेखक होते.
- बंगालीतील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, पूर्णवेळ राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी शिक्षक म्हणून काम केले आणि 1960 च्या मध्यात ते माकपमध्ये सामील झाले.
- 1977 मध्ये कोस्सीपूर मतदारसंघातून ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले आणि वयाच्या 33 व्या वर्षी ज्योती बसू यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या डाव्या आघाडी सरकारमध्ये माहिती आणि सांस्कृतिक मंत्री बनले.
- 1982 च्या निवडणुकीत मात्र ते पराभूत झाले. यामुळे त्यांनी शहराच्या दक्षिणेकडील जादवपूरमधून निवडणूक लढवण्यासाठी त्यांचा मतदारसंघ बदलला आणि 1987 मध्ये ते राज्य मंत्रिमंडळात परतले.
- 1993मध्ये अचानक मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. यानंतर ते सक्रिय राजकारणापासून दुरावले आणि त्यांनी ‘दुष्माई’ (वाईट या काळ) नावाचे नाटक लिहिले.
- वयोवृद्ध बसू यांच्या उत्तराधिकाऱ्याच्य शोधात असलेल्या माकपने भट्टाचार्य यांना राज्याचे गृहमंत्री म्हणून पुन्हा मंत्रिमंडळात समाविष्ट केल्याने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, तीन वर्षांच्या आत ते उपमुख्यमंत्री झाले आणि अखेरीस नोव्हेंबर 2000 मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री बनले.
- त्यांच्या सरकारच्या विकासात्मक उपक्रमांमुळे प्रसारमाध्यमांनी त्यांना ‘ब्रँड बुद्धा’ अशी उपाधी दिली होती.
- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) नेते असलेले भट्टाचार्य सन 2000 ते 2011 अशी जवळजवळ साडेदहा वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते.
- ज्योती बसू यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर राज्याची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचा उद्योजकविरोधी चेहरा बदलला.
- सातवे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी पश्चिम औद्योगिकीकरण बंगालमध्ये आणि शहरीकरणाची मुहूर्तमेढ रोवली.
- तरुणांसाठी अधिकाधिक रोजगार निर्माण व्हावेत, या उद्देशाने मोठे उद्योग राज्यात येण्यासाठी त्यांनी स्वतः लक्ष घातले.
- मात्र टाटा समूहाच्या सिंगूर प्रकल्पाविरोधात तृणमूल काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा फटका बसला आणि 2011 मध्ये त्यांची सत्ता गेली.
- 2015 मध्ये भट्टाचार्य यांनी माकपच्या पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा तर 2018 मध्ये पक्षाच्या राज्य समितीचा राजीनामा दिला.
हॉकीमध्ये भारताला कांस्य पदक
- टोकियो ऑलिंपिकमध्ये पदकाचा दुष्काळ संपविल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिंपिकमध्येही पदकावर मोहोर उमटविली.
- कर्णधार हरमनप्रीत सिंगचे दोन दमदार गोल आणि गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याचा भक्कम बचाव ही भारताच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली.
- भारतीय हॉकी संघाने खेळल्या गेलेल्या कांस्य पदकासाठीच्या लढतीत स्पेनवर 2 – 1 असा विजय मिळवित सलग दुसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये पदक पटकाविण्याची किमया करून दाखवली.
- भारतीय हॉकी संघाला तब्बल 52 वर्षानंतर अशी कामगिरी करता आली.
- भारताच्या हरमनप्रीत सिंगने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये10 गोल नोंदविले.तो स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारा खेळाडूही ठरला.
ऑलिंपिकमधील 13 वे पदक
- भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिंपिकमधील 13 व्या पदकाला गवसणी घातली.
- यामध्ये आठ सुवर्ण, एक रौप्य व चार कांस्य पदकांचा समावेश आहे.
- भारतीय पुरुष हॉकी संघाने 1928 ते 1956 यादरम्यान सलग सहा सुवर्णपदके पटकावण्याची किमया केली होती.
- त्यानंतर 1964 मधील टोकियो व 1980 मधील मॉस्को या दोन ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्णपदक पटकावता आले, मात्र मागील 44 वर्षांमध्ये भारतीय हॉकी संघाला एकाही सुवर्णपदकाला गवसणी घालता आली नाही.
- 1968 व 1972 यादरम्यान भारतीय हॉकी संघाने ऑलिंपिकमध्ये सलग पदके जिंकली होती. त्यानंतर थेट आता (2020, 2024) म्हणजेच 52 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने देदीप्यमान कामगिरी करून दाखवली.
नीरजचा रौप्यवेध
- गत विजेता असलेल्या नीरज चोप्राने पॅरिस ऑलिंपिक 45 मीटर भाला फेकत रौप्यपदक पटकावले.
- पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिंपिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. त्याने 97 मी. भाला फेकला. तर 88.54 मी. भाला फेकत ग्रेनेडाच्या अँडरसन पिटर्सने कांस्य पदक पटकावले.
- वैयक्तिक क्रीडा प्रकारात नीरज सलग दोन ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारा सुशील कुमार, पी. व्ही. सिंधू यांच्यानंतर तिसरा क्रीडापटू ठरला.
बांगलादेशच्या हंगामी प्रमुखपदी महमद युनूस
- नोबेल सन्मान विजेते अर्थतज्ज्ञ महंमद युनूस यांनी 8 ऑगस्ट रोजी बांगलादेशातील हंगामी सरकारच्या प्रमुखपदाची शपथ घेतली.
- बंगभवन या प्रेसिडेन्शियल पॅलेस येथे आयोजित सोहळ्यात 84 वर्षीय महंमद युनूस यांना बांगलादेशचे अध्यक्ष मोहंमद शहाबुद्दीन यांनी प्रमुखपदाची शपथ दिली.
- शेख हसीना यांनी देशातील वाढती अराजकता पाहून पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून सध्या त्या भारतामध्ये आश्रयाला आल्या आहेत.
डॉ. महंमद युनूस
- जन्म : 28 जून, इ.स. 140:चट्टग्राम, बांगलादेश
- हे बांगलादेशातील ग्रामीण बँकेचे संस्थापक आहेत.
- सन 2006 मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
- महंमद युनूस हे ‘बँकर टू द पुअर’ या ग्रंथाचे लेखक आहेत.