बोराडे यांचे निधन
- ग्रामीण भागातील जीवन जगण्यातील घुसमट आणि समाजमनातील अस्वस्थ वर्तमान कथा कादंबरी नाटकांमधून मांडणारे जेष्ठ साहित्य प्राचार्य रावसाहेब रंगराव बोराडे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले .
- मागील आठवड्यातच त्यांना राज्य शासनाच्या भाषा विभागाकडून देण्यात येणारा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता.
- गावगाड्यातील पारंपारिक व्यवसायिकांची जगणे आणि त्यातून होणारी ससेहोलपट मांडणारी पाचोळा ही कादंबरी सुमारे 55 वर्षांपूर्वी प्रकाशित झाली होती.
- या कादंबरीने बोराडे यांना साहित्य विश्वात स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली.
- महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य ते अध्यक्ष ,ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष, हिंगोली येथे भरलेल्या 17 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष इत्यादी पदे त्यांनी भूषवली होती.



