● ब्रिटन सरकारने उत्तर प्रदेश सरकारबरोबर प्रतिष्ठित ‘चेव्हनिंग’ शिष्यवृत्ती कार्यक्रम राज्यात सुरू करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे.
● मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन यांच्या उपस्थितीत लखनऊ येथे हा करार झाला.
● या करारानुसार, राज्यातील 15 विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये एक वर्षाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी (मास्टर डिग्री) संपूर्ण आर्थिक मदत दिली जाईल.
● 1983 पासून, ‘चेव्हनिंग’ हा भारतातील सर्वात मोठा शिष्यवृत्ती कार्यक्रम बनला आहे, या माध्यमातून3,900हून अधिक विद्यार्थी आणि अभ्यासकांना फायदा झाला आहे.
● ‘ब्रिटन-भारत व्हिजन 2035’ अंतर्गत सखोल संबंध वाढवण्यासाठी उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन सध्या लखनऊच्या भेटीवर आहेत.
● ‘चेव्हनिंग भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उत्तर प्रदेश राज्य सरकार शिष्यवृत्ती योजना’ 2026-2029 या तीन शैक्षणिक वर्षांसाठी सुरू राहील.
● पहिल्या वर्षासाठीचे अर्ज 7 ऑक्टोबर 2025 पर्यंत करता येतील
● दरवर्षी पाच विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. उत्तर प्रदेश सरकार विद्यार्थ्यांच्या एकूण खर्चाच्या 50 टक्के योगदान देईल, तर उर्वरित 50 टक्कम रक्कम ब्रिटन सरकार देईल.
चेव्हनिंग शिष्यवृत्ती
● ही युनायटेड किंगडम सरकारची एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना आहे. ही योजना जगभरातील उदयोन्मुख आणि प्रभावशाली व्यक्तींना यूकेमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते.
● या योजनेत, यशस्वी अर्जदारांना यूकेमधील कोणत्याही विद्यापीठात एक वर्षाची पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.