भारताचे ‘चांद्रयान 4′ 2027 मध्ये झेपावणार
- भारत 2027 मध्ये ‘चांद्रयान 4’ ही मोहीम राबविणार असून, चंद्रावरील खडकांचे नमुने या मोहिमेंतर्गत पृथ्वीवर आणले जातील, अशी माहिती विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री जितेंद्रसिंह यांनी दिली.
- त्याचप्रमाणे ‘चांद्रयान 4’ मोहिमेत अवजड ‘एलव्हीएम-3’ प्रक्षेपकाचे किमान दोन वेळा स्वतंत्ररीत्या प्रक्षेपण केले जाईल.
- या प्रक्षेपकातून पाच वेगवेगळे घटक अवकाशात नेले जातील आणि ते कक्षेत एकत्रित जोडले जातील.
- चंद्राच्या पृष्ठभागावरून खडकाचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याचा चांद्रयान 4 या मोहिमेचा हेतू आहे
- भारत पुढील वर्षी ‘गगनयान’ मोहिमेच्या माध्यमातून विशेष रचना केलेल्या अवकाशयानातून भारतीय अंतराळवीर पृथ्वीच्या खालील कक्षेत पाठवणार असून या अंतराळवीरांना पुन्हा सुखरूपरित्या पृथ्वीवर परत आणले जाईल.
- गगनयान या मनुष्यरहित मोहिमेतून ‘व्योमित्र’ नावाचा यंत्रमानवही अवकाशात पाठविला जाईल.”
सागरी संशोधनासाठी ‘समुद्रयान‘
- 2026 मध्ये ‘समुद्रयान’ प्रक्षेपित केले जाणार असून या मोहिमेंतर्गत समुद्राच्या तळाचा शोध घेण्यासाठी तीन शास्त्रज्ञांना पाणबुडीतून समुद्रात सहा हजार मीटर खोलीवर पाठविले जाईल.
- ‘गगनयान’ मोहिमेसह इतर मोहिमांच्या काळातच ही कामगिरी होईल. त्यामुळे, देशाच्या वैज्ञानिक उत्कृष्टतेच्या प्रवासात एक सुखद योगायोग साधला जाईल.
- ‘समुद्रयान’ मोहिमेतून समुद्रातील महत्त्वाची खनिजे, दुर्मीळ धातू आणि सागरी जैवविविधतेसह मोठ्या प्रमाणावर साधनसंपत्तीचे दरवाजे खुले होतील.



