देशाच्या स्वदेशी या संकल्पाअंतर्गत नौदलाच्या जहाजांसाठी आवश्यक असलेल्या टग्सची निर्मितीदेखील देशातच केली जात आहे. त्या अनुषंगाने ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा भाग म्हणून नुकतेच मेसर्स शोफ्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड, भरूच येथे नौदल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूल 25 टन वजनाच्या बोलार्ड पूल टगचे अनावरण नुकतेच करण्यात आले.
अधिक माहिती
• या टगला ‘बलजित’ असे नाव देण्यात आहे.
• केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेच्या अनुषंगाने ती 25 टन वजनाच्या बोलार्ड पूल टग्सच्या बांधकाम तसेच वितरणासाठी मेसर्स शॉफ्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड सोबत करार करण्यात आला आहे.
• त्यानुसार गेल्या महिन्यात नौदलाला पहिल्या 25 टन वजनाच्या महाबली बोलार्ड पूल टगला सुपूर्त करण्यात आले.
वैशिष्ट्ये
• ‘इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग’च्या (आयआरएस) वर्गीकरण नियमांनुसार हे टग्स बांधले जात आहेत.
• टम्सच्या उपलब्धतेमुळे नौदलाच्या जहाजांना व पाणबुड्यांना किनाऱ्यावर पार्क करणे आणि सोडवणे त्याचबरोबर मर्यादित पाण्यात फिरणे आणि वळण घेताना मदत मिळेल.
• यामुळे नौदलाच्या जहाजावर अग्निशमन यंत्रणा वाहून नेता येईल. तसेच मर्यादित स्वरूपाच्या शोध आणि बचाव मोहिमा यशस्वीपणे पार पाडता येतील.