- आशियाईआणि पॅसिफिक नारळ समुदाय जागतिक नारळ दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो.
- जागतिकस्तरावर नारळ लागवडीबद्दल लोकांना जागृत करणे आणि नारळ उद्योगाच्या सर्व उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
- याउद्देशाने 2 सप्टेंबर 2024 रोजी जगभरात ‘जागतिक नारळ दिन’ साजरा केला जात आहे.
जागतिक नारळ दिन – इतिहास
- आशियाईआणि पॅसिफिक कोकोनट कम्युनिटी (APCC) ने 2009 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून हा दिवस चर्चेत आला आणि तेव्हापासून जगभरात 2 सप्टेंबर रोजी ‘जागतिक नारळ दिन’ साजरा केला जात आहे.
- 2009 पासून हा दिवस नारळ दिवस म्हणून साजरा करण्याची परंपरा चालू आहे.
- ज्याउद्देशाने, नारळाचे महत्त्व आणि उपयोगिता याविषयी लोकांमध्ये जागरुकता वाढवणे आणि नारळाचे महत्त्व दर्शविण्यासाठी नारळ दिन साजरा केला जातो.
- थीम: ‘चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी नारळ, जास्तीत जास्त मूल्यासाठी भागीदारी निर्माण’ (Coconut for a circular economy, Building partnership for maximum value) अशी निश्चित करण्यात आली आहे.
- आरोग्यआणि धार्मिक दृष्टीकोनातून नारळाचा उपयोग पूजेत केला जात असला तरी विविध पदार्थ आणि मिठाई बनवून त्याचा अनेक प्रकारे वापर केला जातो.
- तसेचआरोग्य आणि सौंदर्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक घरात नारळ पाणी आणि खोबरेल तेल वापरले जाते.
रस्ता सुरक्षेवर जागतिक परिषदेचे आयोजन
- दुखापतीप्रतिबंध आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणाऱ्या ‘सुरक्षा 2024’ या 15 व्या जागतिक परिषदेचे भारतात 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.
- रस्तेसुरक्षा वाढविण्यासह बुडण्याच्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या जागतिक प्रयत्नांवर या परिषदेत भर दिला जाईल.
- हीपरिषद आयआयटी दिल्लीद्वारे आयोजित केली जाणार असून ‘एम्स’, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्सचे सहकार्य लाभेल.
भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी तेंजिदर सिंग
- एअरमार्शल तेंजिदर सिंग यांनी भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
- हवाईदलाच्या वायू भवन या मुख्यालयात हा पदभार स्वीकारल्यानंतर तेजिंदर सिंग यांनी देशासाठी वीरमरण पत्करणाऱ्या जवानांच्या स्मृतिस राष्ट्रीय युद्ध स्मारकात श्रद्धांजली वाहिली.
- राष्ट्रीयसंरक्षण अकादमीत प्रशिक्षण घेणारे तेजिंदर 13 जून 1987रोजी हवाई दलाच्या लढाऊ दलात रुजू झाले.
- तेजिंदरहे अ दर्जाचे उड्डाण – प्रशिक्षक असून त्यांना स्वतःला साडेचार हजारांहून अधिक तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे
- लढाऊतुकडीचे नेतृत्व करणे, रडार केंद्राची सूत्रे सांभाळणे इत्यादी अनुभव त्यांच्या गाठीशी असून ते जम्मू कश्मीरमध्ये हवाई दलाचे अधिकारीपदी कार्यरत होते.
- तसेचमेघालयातील शिलॉंग येथे त्यांनी सेवा बजावली आहे.
- याप्रदीर्घ व विविध आघाड्यांवरील सेवेबद्दल 2007 यावर्षी त्यांना वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते तसेच 2022 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते अतिविशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आले होते.
ई–गव्हर्नन्सवरील 27 वी राष्ट्रीय परिषद
- प्रशासकीयसुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY), महाराष्ट्र राज्य सरकारच्या सहकार्याने, महाराष्ट्रात मुंबई मध्ये 3- 4 सप्टेंबर 2024 रोजी ई-गव्हर्नन्सवरील 27 वी राष्ट्रीय परिषद (NCeG) आयोजित केली आहे.
- संकल्पना: ‘विकसित भारत: सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ ही या परिषदेची संकल्पना आहे.
- महाराष्ट्रसरकारने ई गव्हर्नन्स संदर्भात राबवलेले विविध यशस्वी उपक्रम या परिषदेत प्रदर्शित केले जातील.
- स्मार्टपीएचसी, सेतूद्वारे डिजिटायझेशन, ब्लॉक चेनद्वारे जात प्रमाणीकरण, पोषण मागोवा, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध संकल्पनांवर राज्याच्या वतीने सादरीकरण केले जाईल.
- याशिवायजिल्हास्तरावरील अनेक उपक्रमांवर चर्चा करून यशस्वी उपक्रमांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातील.
- संपूर्णमहाराष्ट्र आणि भारतातील विविध राज्यांतील विविध प्रकल्पांमधून शिकणे हा यामागचा उद्देश आहे.
ई–गव्हर्नन्सवरील 27 व्या राष्ट्रीय परिषदेविषयी
- यादोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान मंत्रालय, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय, भारत सरकारचा अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग, मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
- यापरिषदेदरम्यान, 16 उल्लेखनीय उपक्रमांना ई-गव्हर्नन्स 2024 साठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातील.
- यापुरस्कारांमध्ये 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि एका ज्युरी पुरस्काराचा समावेश आहे.
- हेपुरस्कार केंद्र, राज्य, जिल्हा अधिकारी आणि शैक्षणिक/संशोधन संस्था अशा पाच श्रेणींमध्ये प्रदान केले जाते.
- भारतातसुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण सुनिशचित करून विकसित भारताच्या दृष्टीकोनात योगदान देण्याच्या उद्देशाने नाविन्यपूर्ण आणि परिवर्तनकारी दृष्टिकोनांवर चर्चा करण्यासाठी सरकारी अधिकारी, उद्योगतज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांना एकत्र आणणे हा या परिषदेचा उद्देश आहे.