‘इस्रो‘ च्या अध्यक्षपदी डॉ. व्ही. नारायणन
- वरिष्ठअवकाश शास्त्रज्ञ आणि स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचे प्रवर्तक डॉ. व्ही. नारायणन यांची दोन वर्षांसाठी अवकाश विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
- अवकाशविभागाचे सचिवच भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष असल्याने डॉ. नारायणन हे ‘इस्रो’चे अध्यक्ष म्हणूनही काम पाहतील.
- 14 जानेवारीलाते एस. सोमनाथ यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
- इस्रोचे ते 11 वे अध्यक्ष असतील.
डॉ. व्ही नारायणन यांच्याविषयी..
- मूळचेतामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील मेलाकट्टू गावचे आहेत
- तामिळमाध्यम शाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या डॉ. नारायणन यांनी क्रायोजेनिक अभियांत्रिकीमध्ये एमटेक आणि आयआयटी खरगपूरमधून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पीएचडी पूर्ण केली.
- एमटेकपदवीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांना रौप्य पदकदेखील मिळाले.
- चेन्नईच्यासत्यबामा विद्यापीठातून त्यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ऑनररी पदवी मिळाली.
- ‘एलपीएससी’च्याअधिकृत वेबसाइटनुसार, नवनियुक्त इस्रो प्रमुखांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
- डॉ. नारायणनयांना रॉकेट आणि संबंधित तंत्रज्ञानासाठी एएसआय पुरस्कार आणि ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (एएसआय) कडून सुवर्ण पदक मिळाले आहे.
- त्यांनीहाय एनर्जी मटेरियल सोसायटी ऑफ इंडियाज टीम अवॉर्ड व्यतिरिक्त उत्कृष्ट कामगिरीसाठी परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड आणि टीम एक्सलन्स अवॉर्डसह अनेक इस्रो पुरस्कार प्राप्त केले आहेत.
- डॉ. व्ही. नारायणनहे एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आहेत, ज्यांना रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये जवळपास चार दशकांचा अनुभव आहे.
- त्यांनी1984 मध्ये इस्रोमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि विविध पदे हाताळली.
- सुरुवातीच्याटप्प्यात त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी) येथे साउंडिंग रॉकेट्स आणि ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉंच व्हेईकल (एएसएलव्ही) आणि पोलर सॅटेलाइट लॉंच व्हेईकल (पीएसएलव्ही) च्या सॉलिड प्रोपल्शन एरियामध्ये काम केले.
- 2018 मध्येत्यांची लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (एलपीएससी) चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, जे इस्रोच्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. त्याचे मुख्यालय तिरुअनंतपुरममधील वलियामाला येथे आहे.
- यासेंटरमध्ये केंद्र प्रक्षेपण वाहनांसाठी द्रव, सेमी-क्रायोजेनिक प्रोपल्शन टप्पे, उपग्रहांसाठी रासायनिक आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शन प्रणाली, प्रक्षेपण वाहनांसाठी नियंत्रण प्रणाली आणि अंतराळ प्रणालींच्या आरोग्य निरीक्षणासाठी ट्रान्सड्यूसर विकसित केले जाते.
ISRO:(Indian Sapce Research Organisation)
- (भारतीयअवकाश संशोधन संस्था)
- स्थापना: 15 ऑगस्ट1969
- मुख्यालय: बंगळुरू
- ब्रीदवाक्य: मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान
- पहिलेअध्यक्ष: विक्रम साराभाई
भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी बहादुरसिंग सागू यांची निवड
- आशियाईसुवर्णपदक विजेते माजी गोळाफेकपटू बहादूरसिंग सागू यांची अॅथलेटिक्स (एएफआय) महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
- मागील12 वर्षांपासून आदिल सुमारीवाला या पदावर होते.
- बहादूरसिंगआता चार वर्षांसाठी (2025-29) अध्यक्षपदावर असतील.
बहादूरसिंग यांच्याविषयी..
- 51 वर्षीयबहादूरसिंग जालंधरचे आहेत. ते सध्या पंजाब पोलिसात कमांडंट म्हणून कार्यरत आहेत.
- बहादूरसिंगयांनी 2002 च्या बुसान आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळा फेकमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे.
- 2000 आणि2004 च्या ऑलिम्पिक्समध्ये भारताने प्रतिनिधित्व.
- त्यांना’पद्मश्री’ने गौरविण्यात आले आहे.
भारतीय ॲथलेटिक्स महासंघाची नवीन कार्यकारिणी
- अध्यक्ष: बहादूरसिंग सागू
- वरिष्ठउपाध्यक्ष: अंजू बॉबी जॉर्ज
- उपाध्यक्ष- अबू मेथा, जयंत मल्ला बारुह, ए. के. शर्मा.
- सचिव: संदीप मेहता
- कोषाध्यक्ष: स्टॅनली जोन्स
- कार्यकारिणीसदस्य : सुधासिंग, हरजिंदरसिंग गिल, शारदादेवी जदम, प्रियांका भानोत, रचिता मिस्त्री, ए. राजावेलू, के. सारंगपाणी.
भारतीय ॲथलेटिक्स महासंघ:
- ॲथलेटिक्सफेडरेशन ऑफ इंडिया ही भारतातील ॲथलेटिक्स खेळाची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे आणि ती देशातील स्पर्धा आयोजित करण्यासाठी जबाबदार आहे.
- स्थापना: 1946
- मुख्यालय: नवीदिल्ली
- माजीअध्यक्ष: आदिल सुमरिवाला
ज्यूँ मारी ल पेन यांचे निधन
- फ्रान्समधीलअतिकडव्या गटाच्या राष्ट्रीय आघाडीचे संस्थापक ज्यूँ मारी ल पेन यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले.
- बहुसांस्कृतिकतावादआणि स्थलांतरितांना त्यांचा प्रखर विरोध होता.
- त्यांच्याया भूमिकेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थक पाठिराखे आणि विरोधकही लाभले.
- लपेन हे फ्रान्सच्या राजकारणामधील ध्रुवीकरण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते प्रसिद्ध होते.
- ज्यू-विरोध, भेदभावाचीवर्तणूक आणि वांशिक हत्यांना प्रवृत्त करण्यासाठी ते अनेकदा दोषी ठरले. मात्र, असे असूनही फ्रान्समध्ये ते लोकप्रिय होते.
- ‘फ्रेन्चपीपल फर्स्ट’ घोषणांमधून यांसारख्या त्यांची विचारधारा आजही फ्रान्स आणि युरोपातील इतर देशांत वाढताना दिसत आहे.
- प्रलयसंकल्पनेचा नकार मुस्लिमांची आणि स्थलांतरितांची वर्णद्वेषी निंदा, 1987मधील एड्स झालेल्या व्यक्तींना जबरदस्तीने विलग ठेवण्याचा प्रस्ताव यांसारख्या त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांच्या टीकाकारांनाही एके काळी धक्के बसले होते.
- 2002मध्येअध्यक्षपदाच्या शर्यतीत ते होते. त्यांची मुलगी मरीन ल पेन यांनी वडिलांच्या विचारांपासून फारकत घेऊन ‘नॅशनल फ्रंट’ या पक्षाच्या नावातही बदल केले. आता हा पक्ष ‘नॅशनल रॅली’ या नावाने ओळखला जातो.
राहीबाई पोपेरे यांना ‘निसर्गमित्र‘ पुरस्कार
- अखिलभारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, निसर्गसेवक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांच्या सन्मानार्थ अॅडव्हेंचर फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ अकोले येथील बीजमाता राहीबाई पोपेरे यांना जाहीर करण्यात आला आहे.
- पर्यावरण, वन्यजीवव निसर्गसेवा या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या निसर्गमित्रांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
- 2025 हेया पुरस्काराचे 17 वे वर्ष आहे.
- सगळीकडेहायब्रीडचे विषारी वाण शेतीत पसरले असताना देशी गावरान बियांचा संग्रह करून पारंपरिक चालत असलेली शेती वाचविण्याचा प्रयत्न पोपेरे यांनी केला आहे.
- गावोगावीजशा पैशाच्या बँका आहेत, तसेच अस्सल गावरान बियाण्यांच्याही बँका तयार झाल्या पाहिजेत, असा प्रयत्न राहीबाई पोपेरे यांनी केला आहे.
- त्यांच्याया कामाची दखल घेत त्यांना अनेक नामवंत पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.