चक्राकार अर्थव्यवस्थेशी संबंधित तंत्रज्ञाने आणि उपायांच्या क्षेत्रात कार्य करणारे, भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील स्टार्ट अप्स आणि लघु ते मध्यम आकाराचे उद्योग यांना या दोन्ही देशांतील संधींचा शोध घेण्यासाठी नवी द्वारे खुली व्हावीत या दृष्टीने तयार केलेल्या नव्या प्रवेगकाचा फायदा होईल. भारत आणि ऑस्ट्रेलियातील चक्राकार अर्थव्यवस्थेशी संबंधित स्टार्ट अप उद्योगांना पाठबळ देण्यासाठी नीती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियानाने आज आरआयएसई अर्थात जलद नवोन्मेष आणि स्टार्ट अप विस्तार नामक नव्या प्रवेगकाची सुरुवात केली.
अधिक माहिती
● ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय विज्ञान संस्था सीएसआयआरओ आणि भारत सरकारने नवोन्मेष तसेच उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु केलेला महत्त्वाचा उपक्रम अटल नवोन्मेष अभियान (एआयएम) यांच्या संयुक्त विद्यमाने हा भारत ऑस्ट्रेलिया आरआयएसई प्रवेगक निर्माण करण्यात आला आहे.
● नीती आयोगाच्या अटल नवोन्मेष अभियानाचे अभियान संचालक डॉ.चिंतन वैष्णव याप्रसंगी म्हणाले, “आरआयएसई प्रवेगक हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सहकार्याने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने तयार केलेला आणि दोन्ही अर्थव्यवस्थांच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्याप्रती समर्पित असलेला बहु-वर्षीय द्विपक्षीय प्रवर्तक कार्यक्रम म्हणून काम करणार आहे.
● पर्यावरण आणि हवामानविषयक तंत्रज्ञानाच्या व्यापक संकल्पनेवर केंद्रित असलेला आरआयएसई हा उपक्रम स्टार्ट अप उद्योगांना जागतिक आव्हाने पेलण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अभिनव उपाययोजना शोधण्यासाठीचा मंच उपलब्ध करून देतो.”
● आभासी पद्धतीने चालणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्टार्ट अप उद्योगांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, तसेच या कार्यक्रमातून त्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांदरम्यानच्या प्रवासाच्या काही संधी उपलब्ध करून दिल्या जातील.
● या उपक्रमात सहभागी होणारे स्टार्ट अप उद्योग 40 लाख रुपयांपर्यंतच्या बिगर-इक्विटी अनुदानासाठी देखील पात्र असतील.


