खंजर हा 11 वा भारत-किर्गिस्तान दरम्यानचा संयुक्त विशेष दल सराव हिमाचल प्रदेशातील बकलोह येथील विशेष दलाच्या प्रशिक्षण शाळेत सुरू झाला आहे. हा सराव 22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये आलटून पालटून आयोजित होणारा हा वार्षिक कार्यक्रम आहे. 20 जवानांचा समावेश असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीचे प्रतिनिधित्व पॅराशूट रेजिमेंट (विशेष दल) चे जवान तर 20 जवानांचा समावेश असलेल्या किर्गिस्तानच्या तुकडीचे प्रतिनिधित्व स्कॉर्पियन ब्रिगेड करत आहे.
उद्देश
● संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या अध्याय VII अंतर्गत निर्मित क्षेत्र आणि डोंगराळ प्रदेशात दहशतवादविरोधी आणि विशेष दलांच्या कार्यान्वयनामधील अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे हा या सरावाचा उद्देश आहे.
● या सरावात विशेष दलाची कौशल्ये, इन्सर्शन आणि एक्सट्रॅक्शनचे प्रगत तंत्र विकसित करण्यावर भर दिला जाईल.
● या सरावामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि कट्टरतावाद या सामायिक समस्यांचे निराकरण करताना संरक्षण संबंध मजबूत करण्याची संधी उभय देशांना मिळेल.
● या सरावामुळे सामायिक सुरक्षा उद्दिष्टे साध्य करण्यासोबतच अत्याधुनिक स्वदेशी संरक्षण उपकरणांची क्षमता दाखविण्याची आणि द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळेल.