इलेक्ट्रॉनिक्स-माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (NIXI), यांनी आज युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स डे निमित्ताने, भाषा नेट या पोर्टलचा शुभारंभ होत असल्याचे जाहीर केले. इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाईनिंग नेम्स अँड नंबर्स (ICANN) या संस्थेच्या सक्रिय समर्थनातून हा कार्यक्रम संपन्न झाला. देशभरात डिजिटल समावेशन वाढवणे आणि इंटरनेटच्या युनिव्हर्सल अॅक्सेप्टन्सला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
अधिक माहिती
• या कार्यक्रमाची संकल्पना, “भाषा नेट: युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स वर भर” अशी असून त्याद्वारे, डिजिटल विश्वात कोणीही व्यक्ती- मग त्यांची भाषा, लिपी कुठलीही असली – तरीही सहभागी होऊ शकतील यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच, निक्सी करत असलेले प्रयत्न अधोरेखित केले जात आहेत.
• युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स क्लॉज अंतर्गत आता ई मेल पत्ता, संकेतस्थळ पत्ता आता प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे.
• प्रगत संगणन विकास केंद्राने (सी-डॅक) त्यासाठी पुढाकार घेतला असून, सुरुवातीला 50 सरकारी संकेतस्थळांचे पत्ते देवनागरीमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत.
• युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स डे 28 मार्चला साजरा करण्यात येतो.
• भारताने, प्रादेशिक युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स डे चे यजमानपद यशस्वीपणे सांभाळले असून, याद्वारे आगामी जागतिक युनिव्हर्सल अॅक्सेप्टन्स डे साठीच्या नियोजनात भरीव मदत होणार आहे. हा कार्यक्रम, 28 मार्च 2024 रोजी सर्बियाच्या बेलाग्रेड इथे होणार आहे.


