देशात रंगीत टीव्ही प्रसारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे मधुकर यादव थोते यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. टीव्ही प्रसारण ब्लॅक अँड व्हाईट असताना 1980 मध्ये दिल्ली दूरदर्शनचे प्रभारी अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती .त्यानंतर त्यांनी कलर ट्रान्समिशन तंत्रज्ञानावर आपले काम सुरू केले.
अधिक माहिती
● दोन वर्षांच्या संशोधन प्रयोग आणि चाचण्यानंतर देशात 1982 मध्ये थोते यांच्या सक्षम तांत्रिक नेतृत्वाखाली रंगीत टीव्ही प्रसारणाचे युग सुरू झाले.
● थोते यांनी देशात आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी प्रसारण केंद्रे उभारण्यात मोलाचा वाटा उचलला.
● 1976 ते 1978 दरम्यान फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये त्यांनी संचालक म्हणून काम पाहिले.
● 1979 यावर्षी आफ्रिकेतील दूरसंचार संस्थेच्या स्थापनेसाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने प्रकल्प संचालक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती.
● 1988 मध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणीचे मुख्य अभियंता म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर थोते यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 22 वर्ष एज्युकेशनल मल्टीमीडिया रिसर्च सेंटर आणि मीडिया व कम्युनिकेशन स्टडीज विभागाचे संचालक म्हणून काम पाहिले.
● ते इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियंता संस्थेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष होते.


