- दोन ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर समारोप सोहळ्यात भारतीय पथकाची ध्वजधारक असेल.
- पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप सोहळा 11 ऑगस्टला होणार आहे.
- मनूने वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक मिळवले.
- यानंतर तिने सरबजोतसिंगसह 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.
- भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 5 ऑगस्ट रोजी तिच्या नावाची घोषणा केली.
अमेरिकेचा लायल्स वेगवान धावपटू
- अमेरिकेच्या नोहा लायल्सने कमालीच्या वेगात चुरशीने झालेल्या ऑलिम्पिक 100 मीटर शर्यतीत 79सेकंद (9.784 सेकंद) अशी वेळ देत वेगवान धावपटूचा किताब पटकावला.
- रोमहर्षक झालेल्या अंतिम शर्यतीत संभाव्य विजेता नोहा लायल्स आणि जमैकाचा आव्हानवीर किशाने थॉम्पसन यांनी एकत्रच अंतिम रेषा ओलांडली.
- दोघांनीही 79 सेकंद अशी वेळ दिली होती. फोटो-फिनिशवरदेखील नेमका विजेता कोण, हे ठळकपणे समोर येत नव्हते.
- अशा वेळी दोघांनी दिलेल्या 79सेकंदाचे एक हजार सेकंदात दोन भाग केले. यामध्ये लायल्सची वेळ 9.784 सेकंद, तर थॉम्पसनची वेळ 9.789 सेकंद अशी आली.
- पुरुषांच्या शंभर मीटर धावण्याच्या अंतिम शर्यतीत आठ धावपट्टू होते विशेष म्हणजे या आठही जणांनी दहा सेकंदाच्या आतील वेळ नोंदवली. असे प्रथमच घडले.
- नोआने अमेरिकेचा 20 वर्षांचा सुवर्णदुष्काळ संपविला.
- तो अमेरिकेसाठी ऑलिम्पिकमधील 100 मीटर धावण्याची शर्यत जिंकणारा जस्टिन गॅटलिननंतरचा पहिला धावपटू ठरला.
- गॅटलिनने 2004मध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
ग्रॅहम थॉर्प यांचे निधन
- इंग्लंडचे माजी कसोटीपटू ग्रॅहम थॉर्प यांचे वयाच्या 55 व्या वर्षी निधन झाले .
- ग्रॅहम 2022 पासून आजारीच होते.त्या वेळी त्यांची अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती.
- ते इंग्लंडकडून 100 कसोटी सामने खेळले.
- यात त्यांनी 66च्या सरासरीने 6,744 धावा केल्या.
- यात 16 शतके आणि 39 अर्धशतकांचा समावेश होता.
- त्याचबरोबर 82 वन-डे सामन्यांत त्यांनी 18च्या सरासरीने 2380 धावा केल्या. यात 21 अर्धशतकांचा समावेश आहे.
- त्यांनी 1993मध्ये कसोटीत पदार्पण केले.
- 2005 मध्ये ते अखेरचा कसोटी सामना खेळले.
हरित भारत अभियान
- राष्ट्रीय हरित भारत अभियान हे हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखड्यांतर्गत नमूद केलेल्या आठ अभियानांपैकी एक आहे.
- संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमार्फत वन आणि बिगर वन विभागात पर्यावरण-पुनर्संचयन उपक्रम हाती घेऊन भारतातील वन क्षेत्राचे संरक्षण, पुनर्संचयन करून त्याचा विस्तार करणे आणि हवामान बदलाला प्रतिसाद देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
- या अभियाना अंतर्गत उपक्रम आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आले होते.
- आजमितीस 1,55,130 हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण/पर्यावरण -पुनर्संचयनासाठी 17 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाला 82 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी योजना
- अपंग व्यक्तींचे सक्षमीकरण विभागाअंतर्गत (दिव्यांगजन) ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंदता (बौद्धिक अपंगत्व) आणि एकाधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी कार्यरत स्वायत्त संस्था राष्ट्रीय ट्रस्ट, देशातील नोंदणीकृत संस्थांद्वारे देशभरात अनाथ असलेल्या अपंग व्यक्ती, ज्या दिव्यांग व्यक्तींचे कुटुंब संकटात आहे आणि ज्या अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूडी) दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील आहेत, अशा व्यक्तीची आजीवन काळजी आणि देखभाल करण्याकरता समर्थ (रेस्पीट देखभाल योजना), घरौंदा (प्रौढांसाठी सामूहिक निवास योजना) तसेच समर्थ-कम-घरौंदा (निवासी देखभाल योजना) इत्यादी उपक्रम राबवत आहे.
- राष्ट्रीय ट्रस्टने आपल्या नोंदणीकृत संस्थांमार्फत देशात 40 ठिकाणी समर्थ (रेस्पीट देखभाल योजना) केंद्रे, घरौंदा (प्रौढांसाठी सामूहिक निवास योजना) केंद्रे आणि समर्थ-कम-घरौंदा (निवासीदेखभाल योजना) केंद्रे स्थापन केली आहेत.