कृषी, आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील शाश्वत विकासासाठी कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी राज्य सरकार आणि ‘गुगल’ यांच्यात ‘एआय फॉर महाराष्ट्र’ सामंजस्य करार ग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. ‘गुगल इंडिया’च्या मुंढवा (पुणे) येथील कार्यालयात करण्यात आलेल्या या कराराप्रसंगी राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, ‘गुगल इंडिया’चे भारतातील प्रमुख व उपाध्यक्ष संजय गुप्ता, नागपूर येथील व्यक्त ‘ट्रीपल आयटी’चे संचालक प्रा. डॉ. ओमप्रकाश काकडे, ‘अॅक्सिस माय इंडिया’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता उपस्थित होते.
सात क्षेत्रांसाठी भागीदारी…
● नावीन्यता आणि उद्योजकतेतील भागीदारीद्वारे गुगल राज्यातील नवउद्यमी परिसंस्थेला तसेच उद्योजकता विकासाला ‘एआय’ तंत्रज्ञान पुरवून सहकार्य करणार आहे.
● तसेच कौशल्य प्रशिक्षण आणि शिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण, नगर नियोजन, वाहतूक नियोजन अशा सात क्षेत्रांसाठी या कराराद्वारे ‘गुगल’चे सहकार्य लाभणार आहे.
● सरकारी सेवांमध्ये नावीन्य आणून सामान्य माणसापर्यंत सरकारी योजना प्रभाविपणे पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे.