Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महाराष्ट्रातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक चे सहाय्य

महाराष्ट्रातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक चे सहाय्य

एस्सार समूहाचे सहसंस्थापक शशी रुईया यांचे निधन

  • पहिल्या पिढीचे उद्योजक आणि छोटेखानी बांधकाम व्यवसायाला पायाभूत सुविधा क्षेत्रातील एस्सार समूहात रूपांतरित करणारे शशिकांत रुईया यांचे दीर्घ आजाराने वयाच्या 80 व्या वर्षी  मुंबईत निधन झाले.
  • वडील नंदकिशोर रुईया यांच्या मार्गदर्शनाखाली कारकीर्दीची सुरुवात करून, शशी आणि त्यांचा भाऊ रवी यांनी 1969 मध्ये एस्सारची पायाभरणी केली.

अँजेला मर्केल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

  • जर्मनच्या माजी चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्या ‘फ्रिडम’ या  पुस्तकाचे  प्रकाशन झाले.
  • या पुस्तकात मर्केल यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील घडामोडींचा आढावा घेतला असून या काळातील जागतिक नेत्यांबरोबरील काही कटू-गोड आठवणीही शब्दबद्ध केल्या आहेत.
  • या पुस्तकात त्यांनी – ब्रेक्झिटबाबतच्या निर्णयाबद्दलही त्यांची मते सविस्तरपणे मांडली आहेत.

पहिले प्लास्टिक पुनर्वापर प्रदर्शन मुंबईत होणार

  • देशातील पहिले वहिले प्लॅस्टिक रिसायकलिंग – तंत्रज्ञान प्रदर्शन; तसेच पर्यावरणपूरक  पॉलिथिन आणि फोम प्रदर्शन (प्लॅस्टिक – रिसायकलिंग शो) मुंबईतील गोरेगावच्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये 4 ते 6 – डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात – आले आहे.
  • सध्या देशातील पुनर्वापर केलेल्या प्लॅस्टिकची बाजारपेठ एक कोटी टनांची – आहे. ती 2032 मध्ये सव्वादोन कोटी – टनांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.
  • देशात दरवर्षी जेमतेम दीड लाख टन प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याची क्षमता  असून, त्यात वाढीची मोठी संधी आहे,  त्यासाठी या क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक उपायोजना याची माहिती या प्रदर्शनात मिळेल.
  • मीडिया फ्युजन व क्रेन  कम्युनिकेशन तर्फ हे प्रदर्शन आयोजित  करण्यात आले आहे

महाराष्ट्रातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक चे सहाय्य

  • एशियन डेव्हलपमेंट बँक  ने महाराष्ट्रात दर्जेदार आणि परवडणारी तृतीय श्रेणी आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रवेश सुधारण्यासाठी 500 दशलक्ष यूएस डॉलर कर्जाचे पॅकेज वचनबद्ध केले आहे.
  • हे पॅकेज भारतातील राज्याच्या नेतृत्वाखालील आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षण केंद्रे  स्थापन करण्यात मदत करेल.
  • हे पॅकेज चार वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मदत करेल ज्यामध्ये हवामान आणि आपत्ती- प्रतिरोधक, लिंग-प्रतिसादात्मक आणि सामाजिकदृष्ट्या समावेशक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
  • हे पॅकेज लोकांचा खिशाबाहेरील खर्च कमी करेल आणि दर्जेदार वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती आणि कायम ठेवण्यासाठी धोरणात्मक कृती तयार करेल.

आसाम मधील जिल्ह्याचे नाव बदलले

  • आसाममधील होजाई  जिल्ह्याच्या मुख्यालयाचे नाव आता श्रीमंत शंकरदेवनगर असे करण्यात आले आहे.
  • मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा ही माहिती दिली.राज्य मंत्रिमंडळाने याबाबतचा निर्णय घेतला

करीमगंज आता श्रीभूमी म्हणून ओळखले जाणारे

  • आसाम मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने ‘करीमगंज’ जिल्ह्याचेही नाव बदलण्याची घोषणा केली आहे.
  • हे शहर आता ‘श्रीभूमी’ या नावाने ओळखले जाणार आहे.
  • ‘श्रीभूमी’ हे नाव बदलल्याने आसामच्या विविधतेशी आणि इतिहासाशी जुळणाऱ्या जिल्ह्याच्या ओळखीला नवा आणि सांस्कृतिक संदर्भ मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
  • त्यांनी या निर्णयाचे वर्णन आसामचा सांस्कृतिक वारसा मजबूत करणारा असे केले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *