महाराष्ट्र सरकार आणि ‘बजाज फिनसर्व्ह’ यांच्यात सुमारे 5000 कोटी रुपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार 3 जून 2023 रोजी करण्यात आला.
आर्थिक सेवा क्षेत्रातील देशातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष संजीव बजाज यांच्या उपस्थितीत हा करार झाला.
या कराराच्या माध्यमातून पुणे येथील मुंढवा या ठिकाणी वित्तीय केंद्र उभारण्यात येणार आहे .
या गुंतवणुकीमुळे 40,000 रोजगार निर्मिती होऊन आर्थिक सेवा होण्यासाठी पुण्याला मोठी चालना मिळणार आहे.
या प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी सरकारद्वारे पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पुण्याजवळ मुंढवा येथे या वर्षी अखेर प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
सेवा क्षेत्रात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केली आहे. राज्याच्या सकल राज्य उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा 53 ते 58% पर्यंत आहे.
सेवा क्षेत्रातील या मोठ्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्राचा मोठा फायदा होणार आहे. प्रत्यक्ष रोजगार निर्मितीत भर पडणार आहे. आर्थिक सेवा हबमुळे वित्तीय तसेच सेवा क्षेत्रात राज्यात गुंतवणूक वाढण्यास मदत होईल.


