भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत चौथ्या स्थानापर्यंत नेणाऱ्या प्रशिक्षक यान्नेक शॉपमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शॉपमन यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ या वर्षी ऑगस्टमध्ये संपणार होता.
अधिक माहिती
● शॉपमन यांनी 2021 मध्ये शोर्द मरीन यांच्याकडून भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली होती.
● त्यांच्या कार्यकाळात भारतीय महिला संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावले. मात्र, या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात भारतीय संघ अपयशी ठरला.