मिझोरम विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटचा पराभव करून झोरम पीपल्स मूव्हमेंट(झेडपीएम) हा पक्ष सत्तेत आला आहे.40 सदस्यांच्या विधानसभेत झेडपीएमने 27 जागा जिंकल्या आहेत.
एकूण जागा : 40
• झेडपीएम- 27
• एमएनएफ – 10
• भारतीय जनता पक्ष – 2
• काँग्रेस – 1
‘झेडपीएम’ विषयी
• मिझोरममध्ये छोटे छोटे वांशिक गट आहेत. या गटांच्या विविध संघटना आहेत. मिझोरम पीपल्स कॉन्फरन्स, झोरम नॅशनॅलिस्ट पार्टी, झोरम एक्सोडस मुव्हमेंट,
• झोरम दोन वेगवेगळे फ्रंट, मिझोरम पीपल्स फ्रंट असे सहा छोटे स्थानिक पक्ष तसेच नागरी संस्था यांनी एकत्र येऊन झोरम पीपल्स मूव्हमेंट या पक्षाची 2017 मध्ये स्थापना केली होती.
• झोरम याचा अर्थ उंचावरील जागा किंवा दरी असा आहे. मिझोरमची फोड ‘मी म्हणजे लोक’ तर ‘झोरम म्हणजे उंचावरील जागा किंवा दरी’ अशी केली जाते. यातूनच झोरम पीपल्स मूव्हमेंट असे पक्षाचे नामकरण झाले
• झेडपीएम चे अध्यक्ष:- लालदुहोमा


