बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रातील तीव्रता वाढून त्याचे मीचौंग या चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ 4 डिसेंबर 2023 रोजी नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्रप्रदेशचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला म्यानमार या देशाने नाव सुचविले आहे. त्याचा अर्थ ताकद किंवा लवचिकता असा होतो.


