मुंबईने विदर्भाची झुंज मोडून काढताना 42 व्यांदा रणजी करंडक उंचावण्याचे आपले आठ वर्षांपासूनचे स्वप्न साकार केले. ऑफ – स्पिनर तनुष कोटियनच्या (4/95) प्रभावी माऱ्यामुळे मुंबईने अंतिम सामन्यात 169 धावांनी विजय साकारला.
• विजेता – मुंबई
• उप विजेता – विदर्भ
• अंतिम सामना – मुंबई
• सहभागी संघ – 38
मुशीर सामन्यात, तर तनुष स्पर्धेत सर्वोत्तम
• अष्टपैलू कामगिरीबद्दल मुशीर खानची अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी निवड झाली.
• तर यंदाच्या रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मुंबईचा अष्टपैलू तनुष कोटियनला मिळाला.
• मुशीरने अंतिम सामन्याच् दुसऱ्या डावात 136 धावांची खेळी केली आणि मोक्याच्या क्षणी दोन गडी बाद केले.
• दुसरीकडे, तनुषने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याने ऑफ स्पिन गोलंदाजी करताना 10 सामन्यांत 29 बळी मिळवले आणि फलंदाज म्हणून 502 धावांचे योगदान दिले.
‘एमसीए’कडून पाच कोटी
• मुंबईने रणजी करंडक पटकावलाच, शिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) विजेत्या संघाला मिळणारे पाच कोटी रुपयेही आपल्या नावे केले.
• यासह मुंबई क्रिकेट संघटनेनेही (एमसीए) आपल्या विजेत्या संघाला पाच कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.
• “एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे आणि कार्यकारी परिषदेने मिळून रणजी विजेत्या मुंबई संघाला आणखी पाच कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
रणजी करंडक
• रणजी करंडक ही भारतात खेळली जाणारी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे दरवर्षी आयोजित केली जाणारी प्रमुख देशांतर्गत प्रथम-श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे .
• प्रादेशिक आणि राज्य क्रिकेट संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे संघ सहभागी होतात.
• BCCI ने 1934 मध्ये चॅम्पियनशिपची स्थापना केली, तेव्हापासून ती भारतातील विविध मैदाने आणि स्टेडियमवर आयोजित केली जात आहे.