रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांना भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘व्हॉईस आणि डेटा’द्वारे प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष मॅथ्यू ओमन यांना वर्ष 2023 साठी ‘पाथब्रेकर ऑफ द इअर अॅवॉर्ड’ देण्यात आला.
अधिक माहिती
• ओमन यांना देशात ‘फाइव्ह-जी’ नेटवर्क वेगवान पद्धतीने पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे.
• मॅथ्यू ओमन यांना नीरज मित्तल आणि गोपाल विठ्ठल यांच्यासह संयुक्तपणे हा पुरस्कार मिळाला आहे.
• रिलायन्स – जिओला ‘व्हॉईस आणि डेटा’ पुरस्कार सोहळ्यात नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर, बहुभाषिक इंटरनेट, आयओटीसह विविध श्रेणींमध्ये आणखी सहा पुरस्कार मिळाले आहेत.


