Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन यांना दोन वर्षे मुदतवाढ

मुख्य आर्थिक सल्लागार नागेश्वरन यांना दोन वर्षे मुदतवाढ

 

  • केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांचा कार्यकाळ मार्च 2027 पर्यंत दोन वर्षांसाठी वाढवला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नागेश्वरन यांचा कार्यकाळ 31 मार्च 2027 पर्यंत वाढवला आहे.
  • नागेश्वरन यांची 28 जानेवारी 2022 रोजी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून निवड करण्यात आली.
  • 2022-23चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली होती.
  • केंद्र सरकारला आर्थिक धोरणांवर सल्ला देणे यासह केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी संसदेत सादर केला जाणारा आर्थिक पाहणी अहवाल तयार करण्याचे काम हे मुख्य आर्थिक सल्लागारांचे कार्यालय करत असते.
  • माजी मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमणियन यांच्यानंतर मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नागेश्वरन यांची निवड करण्यात आली होती.
  • मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्तीआधी नागेश्वरन हे 2019 ते 2021या काळात पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अर्धवेळ सदस्य देखील होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *