● महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी राजेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
● विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या 30 जून रोजी निवृत्त होत असल्याने राजेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
● राज्याच्या मुख्य सचिवपदाच्या स्पर्धेत गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबालसिंह चहल आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगरानी यांची नावे होती. पण राजेशकुमार मीना हे ज्येष्ठ सनदी अधिकारी असल्याने मुख्य सचिवपदावर त्यांची नियुक्ती झाली.
● 1988 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी राजेश कुमार मुळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेली आहे.
● त्यांनी सोलापूर जिल्हयात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरूवात केली.
● बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धाराशिव,जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महापालिका आयुक्त, आदिवासी विकास आयुक्त. उद्योग, ग्रामविकास, सहकार विभागाचेअप्पर मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.
● राजेश कुमार यांना मुख्य सचिवपदासाठी केवळ दोनच महिने मिळणार असून ते आॅगस्ट 2025 मध्ये निवृत्त होतील.